या मधे आणखी दोन आरोपीना पो स्टे गोरेगाव अप क्र 200/24 कलम 302 भादवी खून प्रकरणामध्ये अटक – कलम 120(ब ), 34 भादवी कलमवाढ झाली असून आरोपी क्र. 2) कुवरलाल रामचंद इडपाचे वय 29 वर्ष, 3)कृष्णा प्रेमलाल मडकाम वय 32 दोन्ही रा म्हसगाव ता गोरेगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीतांची नावे आहेत
म्हसगाव येथे घटनेच्या दिवशी धिवरु इळपाचे यांनी पत्नी लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेली होती. तर ते व त्यांची आई घरी होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखा व गोरेगाव पोलिसांनी म्हसगाव येथील शंभरावर लोकांची, नातेवाईकांची चौकशी केल्यावर संशयाच्या आधारे विरेंद्र इडपाचे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने घराच्या जुन्या वादातून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास गोरेगाव पोलिस निरीक्षक भुसारी करीत आहेत.