नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई, ११ दिवस कारावास

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमगाव : आमगाव येथे प्रतिबंधिक असलेला नॉयलॉन मांजा विक्री करणार्‍या विक्रेत्यावर आमगाव प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांनी दंडात्मक तसेच दंड न भरल्यास 11 दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली. दशरथ डेकाटे असे आरोपीचे नाव आहे.शासनाने प्रतिबंधित केलेला नॉयलॉन मांजा विक्री प्रकरणी 11 जानेवारी 2024 रोजी आमगाव पोलिसांनी आमगाव येथील तुकडोजी चौकातील आरोपीवर कारवाई करीत गुन्हा दाखल केला होता. तसेच तपासाअंती आमगाव न्यायालयात दोषारोप सादर केले होते. दरम्यान न्यायालयात आरोपींवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायदंडाधिकार्‍यांनी आरोपीला 450 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 11 दिवस साधा कारावाची शिक्षा सुनावली.