अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चोरीला गेलेले मोबाइल नागरिकांना केले सुपूर्द

0
6

गोंदिया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सर्वात महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया याच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गोंदिया  पोलिसांनी जिल्ह्यातील काही नागरिकांना एक सुखद धक्का दिला आहे. पोलीस विभागाद्वारे जिल्ह्यातील 50 मोबाईल धारकांचे मोबाईल शोधून त्यांच्या मुळ मालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर,पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंंशी यांच्या हस्ते स्वाधीन करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी आनंद व्यक्त केला आहे.

साडेतीन मुहूर्तंपैकी एक असा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तांवर गोंदिया पोलीस विभागाद्वारे चोरी गेलेले तसेच हरवलेले मोबाईल त्यांच्या मालकांना स्वाधीन केल्याने पोलीस प्रशासनाचे या नागरिकांनी आभार  मानत आनंद व्यक्त केला. पोलिसांवर विश्वास ठेऊन मोबाईल संबंधी तक्रार नोंदवावी, असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील बस स्थानक,आठवडी बाजार, रुग्णालय, रेल्वे स्थानकातून मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्याची तक्रार नागरिकांना कडून पोलिसांकडे आल्याचे निदर्शनात आले होते. असे असताना पोलिसांनी यावर आळा बसावा यासाठी विशेष मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या जवळील हे मोबाइल जप्त केले आहे. तसेच यात सायबर सेलची मदत घेत चोरीला गेलेले काही मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहे.

गोंदिया शहर पो.नि.चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोमनाथ कदम, पोहवा जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, मपोहवा रिना चव्हाण, पोशि कुणाल बारेवार,अशोक रहांगडाले, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन तसेच सायबर सेल येथील पो.हवा. दिक्षीत दमाहे, प्रभाकर पालांदुरकर, धनंजय शेंडे, संजय मारवाडे यांनी हे मोबाईल व इतर साहित्य शोधून काढण्यात मोलाची कामगीरी केली आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
यात सॅमसंग, विवो, वन प्लस, ओपो, एप्पल या सारख्या 50 महागाड्या मोबाईलवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला असता पोलिसांनी हे सर्व मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत केले आहे . तर यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरविला असल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची रितसर तक्रार पोलिसांकडे करावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी केले.