वाहन अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर गंभीर

0
10
चिमूर,दि.१३ :-चिमूर कानपा या राज्य महामार्गावरील शंकरपूर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोमा फाट्यावर चारचाकी व दुचाकी वाहनाच्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.या अपघातातर मृतकाचे दुचाकी वाहन जळालेले असून ही घटना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.
श्रावण बापूराव गुरनुले 48 असे मृतकाचे नाव असून पत्नी कल्पना गुरणुले ह्या गंभीर जखमी आहेत. हे दोघे डोमा येथील रहिवासी असून आज सकाळी लावारी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. तेंदुपत्ता तोडून स्वतः च्या दुचाकीने घराकडे परत येत असताना डोमा फाट्यावर दुचाकीची धडक शंकरपुर येथे लग्न कार्यासाठी येत असलेल्या स्कार्पिओ या चारचाकी वाहनाला लागली. त्यात श्रावण यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळीस त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी कल्पना इला गंभीर दुखापत झाली.सोबत असणाऱ्या तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांनी कल्पना हिला लागलीच शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.परंतु गंभीर असल्यामुळे तिला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.घटनास्थळी दूचाकीने पेट घेतला असून ती जळून खाक झाली. स्कार्पिओ वाहन चालकाला शंकरपूर येथील बस स्थानकाजवळ अडवून त्यांचे वाहन जप्त करण्यात आले.अधिक तपास शंकरपूर पोलीस चौकीचे कर्मचारी करीत आहे..