दोन वाघाच्या झुंजीत एका अडीच वर्षीय वाघाचा मृत्यू

0
13
file photo

चंद्रपूर : दोन वाघाच्या झुंजीत अडीच वर्षीय वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील किन्ही नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५१० मध्ये घडली. मागील दहा महिन्यांत बल्लारपूर वनपरिक्षेत्रात सहा वाघांचा मृत्यू झाल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे.

बल्लारपूर वनविभागाचे वनकर्मचारी व वनरक्षक गस्तीवर असतांना त्यांना कक्ष क्रमांक ५१० मध्ये वाघ मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी दाखल होवून वाघाच्या म़ृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शविवच्छेदनासाठी ताडोबाच्या वन्यजीव उपचार केंद्रात आणण्यात आले. वाघाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार यांनी केले. वाघाच्या शरीरावर जखमा असल्याने दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मृत्यूचे नेमके कारण कळावे यासाठी ‘विसेरा’ प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.