संस्थापक-शिक्षकाच्या वादात मध्यस्थी करणार्‍या लिपीकाची हत्या;डवकी येथील घटना

0
31

देवरी – वादात मध्यस्थी करणे किती महागात पडू शकते, हे देवरी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालयातील झालेल्या घटनेवरून देवरीकरांना अनुभवास आले. शाळा संस्थापक व शिक्षकाचा सुरू असलेला वाद शमविण्यासाठी पुढाकार घेणार्‍या लिपीकाला जीव गमवावा लागला. वादात मध्यस्थी करणार्‍या लिपीकालाच शिक्षकाने जब्बर मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लिपीकाचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला. ही घटना आज (ता.१६) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. मुकूंद बागडे (६०) रा.मुल्ला असे मृतकाचे नाव आहे.