गोरेगांव दि.१६ः वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११५ व्या ग्रामजयंती निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा बाम्हणी द्वारे महात्मा गांधी चौक बाम्हणी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व अनावरण जि.प.सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना डाॅ.भगत म्हणाले की,ग्राम उन्नतीचा खरा पाया म्हणजे शिक्षण,उद्याचे राष्ट्र घडविणारे आजचे संतान आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे मुळ नाव माणिक बन्डोजी इंगळे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली गावात त्यांचा जन्म झाला.
यांनी आपले पुर्ण जिवन समाज सेवेसाठी समर्पित केले.ग्रामगिता व भक्तीगितांच्या माध्यमातुन त्यांनी उपदेश दिले.
कार्यक्रमाच्या उद्घाटक पं.स.सदस्य शशिकला ताई ताराम या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच झूमक बिसेन,माजी सरपंच गीताताई बिसेन,हेमलताताई राउत,गीताताई भलावी,खेलनबाई राउत,हेमराजजी कोरे व गावकारी बंधु उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता आरती व प्रसादाने करण्यात आली.