तिरोडा शहरात एकाच रात्री ४ दुकाने फोडणारी टोळी गजाआड

0
22

गोंदिया,दि.२०ः तिरोडा पोलीस ठाणे अंतर्गत शहरात एकाच रात्री ४ दुकाने फोडून साहित्य लंपास करणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुर व एकास तिरोडा येथुन जेरबंद करून बेड्या ठोकत मुद्येमाल हस्तगत केला आहे.सविस्तर असे की, दिनांक- १७/०५/२०२४ चे रात्री २१.३० वा तें दि.१८/०५/२०२४ चे ०७.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोररटयांनी मौजा गंज बाजार तिरोडा येथील ४ ते ५ दुकानांचे शटर तोडून किराणा दुकान, मेडीकल दुकानातील गल्लयातील चिल्लर व नगदी चोरून नेल्याने फिर्यादी संजय मेटवानी रा. कंवरराम वार्ड, तिरोडा यांचे तक्रारी वरून पो. ठाणे तिरोडा येथे अप.क्र. ३२०/२०२४ कलम ३८०, ४५७ भांदवि प्रमाणे दाखल करण्यात आले होते.

तिरोडा शहरात एकाच रात्री चोरटयांनी ४ ते ५ दुकाने फोडल्याने शहरातील व्यापार वर्गात चोरटयांचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.वरीष्ठांनी तिरोडा शहरातील घडलेल्या चोरी प्रकरणाचे गांर्भीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा पथकास, तसेच पोलीस ठाणे तिरोडा पोलीसांना सदर गुन्हयातील चोरट्यांचा शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हयात तात्काळ अटक करण्याबाबत निर्देशित केले होते.

या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी  साहिल झरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना घटनास्थळ शेजारी तसेच तिरोडा शहरात लागलेले सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली.त्यात प्राप्त सीसीटिव्ही फुटेज आणि प्राप्त गोपनिय माहीती वरून सदर गुन्हयातील चोरटयांनी एका काळया रंगाच्या मारूती अल्टो गाडीचा वापर केल्याचे दिसून आले.तपासादरम्यान सदरची गाडी ही भारत कंटेनर्स कंपनीचे युनीट १ चे गेट क्र.१ चे बाजुस नागपुर येथे उभी असल्याची माहीती प्राप्त झाल्याने पोलीस पथकाने पो. ठाणे हिंगणा एमआयडीसी नागपुर येथे जाऊन तेथील पोलीस स्टॉफ मदतीने सदर गुन्हयात वापरलेली गाडी क्र. एम.एच. ३१ सीएम-६४३२ ही ताब्यात घेतली.सदर गाडी भारत कंटेनर्स कंपनीचे युनीट १ चे गेट क्र.१ चे बाजुला उभी असल्याचे दिसून आल्याने कंपनी वॉचमैन यांस गाडीबाबत विचारपुस केली असता सदर कंपनीत काम करणारे गाडीचे मालक आरोपी नामे रविकांत दयानंद गोंड वय ३७,रा.प्लॅट न.९३ पी.एन. नायडू इंडस्ट्रियल एरीया नागलवाडी ता. हिंगणा नागपुर यांस ताब्यात घेवून तिरोडा येथे गुन्हयात त्याच्या गाडीचा झालेला वापर व गुन्हयासंबंधात सखोल विचारपुस केली. सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. विश्ववासात घेवून त्यास पुन्हा गुन्हयासंबंधाने विचारपुस चौकशी केली असता त्याने मित्र महेश बालाराम दुरूगकर वय ४४,रा.मुकेश किराणा जवळ निलडोह नागपूर,नागेश हिरामण तिजारे वय २३,रा. अमरनगर,ता.हिंगणा,नागपूर,समीर प्रमोद गडपायले वय २४,रा. वानाडोंगरी नागपुर असे मिळुन तिरोडा येथील त्यांचा मित्र रियाज ऊर्फ राजा रमजान कुरेशी वय २४ रा.नेहरू वार्ड तिरोडा व फरार आरोपी सौरभ गजभिये रा.जुनी वस्ती तिरोडा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तिरोडा येथे चोरी करण्याचे ठरले.त्यानुसार तिरोडा येथे जाऊन दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याचे यातील आरोपी क्र. १ ते ५ यांनी सांगुन कबुल केले.आरोपी ताब्यातून गुन्हयात वापरलेली मारूती अल्टो कंपनीचे चारचाकी वाहन, गुन्हयात चोरलेली रक्कम रूपये २९९०/-रूपये गुन्हयात हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे . आरोपी क्र. १ ते ५ यांना गुन्हयात जेरबंद करून तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीतांना गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन पुढील कायदेशिर कारवाई तिरोडा पोलीस करीत आहेत.याच आरोपीतांनी काही दिवसा पूर्वी बालाघाट येथे सुद्धा अश्या प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यांनद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी. तिरोडा साहिल झरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनांत पोउपनि महेश विघ्ने, पोलीस अंमलदार पोहवा सुजित हलमारे, इंद्रजित बिसेन, दुर्गेश तिवारी, पोशि संतोष केदार, चापोशि घनश्याम कुंभलवार स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी केली आहे.