सरपंच पत्नी आणि पती, लागले रंगेहाथ एसीबीच्या हाती…

0
133
अमरावती,दि.२२ः जिल्ह्यातील धारणी या आदिवासी तालुक्यातील अढाव येथील सरपंच सौ.जसमाय छोटेलाल मावस्कर(वय ३८)  व सरपंच यांचे पती  छोटेलाल सोनाजी मावस्कर,वय ४२ वर्ष, व्यवसाय शेती,रा.अढाव, पो.तारूबांदा ता. चिखलदरा, जि.अमरावती यांना सरपंच आणि तिच्या पतीकडून शासनाकडून मिळत आलेल्या अनुदानाचे योजनेतील पैशांमधून लाच मागितल्याच्या प्रकरणावरुन सापळा कारवाई दरम्यान लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सविस्तर असे की,   दि. १६/०५/२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीत तक्रारदार यांनी सांगितले की, तक्रारदार यांना सन २०२० पासुन राहणीमान भत्ता मिळाला नव्हता. त्यामुळे तक्रारदार यांनी दि. ०२/०५/२०२४ रोजी राहणीमान भत्ता मिळणेकरिता ग्रामपंचायत अढाव यांचेकडे अर्ज केला होता. तक्रारदार याचे राहणीमान भत्त्याचे चेकवर स्वाक्षरी करण्याकरिता तक्रारदार हे संरपंच सौ.जसमाय छोटेलाल मावस्करकडे गेले असता सरपंच सौ.मावस्कर यांनी चेकवर सही करण्यासाठी तक्रारदार यांना २५००० रूपयाची मागणी केली.
   प्राप्त सदरच्या तक्रारीवरून दि. १७/०५/२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान सरपंच सौ. जसमाय छोटेलाल मावस्कर हिने २५,००० रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर सोमवार दि.२०/०५/२०२४ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान सौ.जसमाय छोटेलाल मावस्कर सरपंच अढाव ग्रामपंचायत व छोटेलाल मावस्कर सरपंच यांचे पती यांने तक्रारदार यांचेकडून तडजोडीअंती मागणी केलेली २०,००० रूपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने त्या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले आहे. दोन्ही आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन धारणी येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे.
   सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, सहा.पोलीस निरीक्षक सतिश उमरे, पो.हवा.प्रमोद रायपुरे, म.पो.हवा.विद्या राउत, पोलीस अंमलदार शैलेश कडू,चालक पोउपनि बारबुध्दे यांनी पार पाडली.