वाढदिवसाच्या शुभेच्छा
अमरावती,दि.२२ः तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय गोविंदपुरच्या ग्रामसेविकेला बांधकाम कंत्राटदाराकडून २५,००० रुपयांची लाच घेत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडुन, अमरावतीच्या पंचवटीत पंचनामा करून गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या कोठडीत रवाना करण्यात आले.
सविस्तर असे की, कु.वृषाली भुजंगराव दिवाण,वय ४२ वर्षे, पद-ग्रामसेवक,ग्रामपंचायत ( ब्राह्मणवाडा ) गोविंदपुर ता.जि. अमरावती असे त्या ग्रामसेविकेचे नाव असून करजगाव पो.डवरगाव ता.जि.अमरावती येथील तक्रारदार कंत्राटदार यांनी ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा (गोविंदपुर) अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची तीन बांधकामे केली आहेत.त्यांनी केलेल्या कामाचे व यापूर्वी केलेल्या एका कामाचे असे एकूण चार कामाच्या एकूण बिलाच्या दहा टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल त्याशिवाय बिल काढणार नाही असा दम देत ग्रामसेविका कु.वृषाली दिवाण हिने सरळसरळ लाचेची मागणी करीत असल्या बाबत तक्रारदार यांनी काल दि.२०/०५/२०२४ रोजी तक्रार दिल्यावरून आज मंगळवार दि.२१/०५/२०२४ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान ग्रामसेवक महिलेने लाचेची मागणी करून तडजोडीअंती २५,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.त्यावरून २१ मे रोजी लावलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान २५,००० रुपये पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारल्याने कु.वृषाली भुजंगराव दिवाण ह्या लाचखोर ग्राम सेविकेला लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून, तिच्या विरुद्ध पोलीस स्टेशन गाडगे नगर अमरावती येथे भ्रष्टाचार विरोधी कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सदरहू कारवाई सापळा व तपास अधिकारी योगेश दंदे,पोलीस निरीक्षक,ला.प्र. विभाग,अमरावती यांच्या नेतृत्वात सापळा कारवाई पथकातील पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, ला.प्र.वि.अमरावती पोहवा. स्वाती जनबंधू पोशि.आशिष जांभोळे, पोशि.वैभव जायले, ला.प्र.विभाग.अमरावती यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.