नापास झालेल्या विद्यार्थ्यांची रेल्वेसमोर आत्महत्या

0
8

गोंदिया–महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परिक्षा मंडळाच्या वतीने काल (ता.२१) बारावीचा निकाल जाहिर करण्यात आला. दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली. त्यातच आमगाव तालुक्यातील ननसरी येथील नापास झालेल्या विद्यार्थ्यांने नैराश्येतून रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. ही घटना २१ मेच्या रात्री ७ वाजता सुमारास गोंदिया-रायपूर रेल्वे मार्गावर आमगाव शिवारात घडली. मोहित चंद्रप्रकाश पटले (१७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

ननसरी येथील धक्कादायक घटना
विद्यार्थ्यांनी परिक्षेदरम्यान कसलेही नैराश्यता अंगीकारू नये, असे मार्गदर्शन व समुपदेशन सातत्याने शिक्षण विभागाकडून दिले जाते. असे असतानाही परिक्षेत नापास झाल्याने नैराश्यतून अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलतात. याची प्रचिती काल (ता.२१) आमगाव तालुक्यातील ननसरी येथे आली. तालुक्यातील ननसरी येथील मोहित चंद्रप्रकाश पटले याने मार्च-एप्रिल महिन्यात बारावीची परिक्षा दिली. हा विद्यार्थी आदर्श विद्यालय आमगाव येथे शिक्षण घेत होता. काल परिक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल जाहिर झाला. दरम्यान मोहित पटले हा नापास झाला. त्यामुळे त्याने काल सायंकाळी नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलून आमगाव शिवारातील महादेव पहाडीजवळ धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ननसरीसह आमगाव तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे.आमगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.