एसटीची दुचाकीला धडक; दाम्पत्य जखमी

0
12

गोरेगाव  : गोंदिया – गोरेगाव मार्गावरील ढिवरटोली परिसरात गोंदियाकडे जाणार्‍या एसटी बसने विरूध्द दिशेला जावून दुचाकीला जबर  धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार पती-पत्नी जखमी झाले. ही घटना सकाळी ११ वाजता सुमारासची आहे. भुमिंद्र पटले (४५), निता भुमिंद्र पटले (४०) दोन्ही रा.तुमखेडा असे जखमीचे नाव आहे. दोन्ही जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूरकडून गोंदियाकडे प्रवासी घेऊन येत असलेल्या एसटी बसच्या चालकाने लापरवाहीने चालवून ढिवरटोली गावशिवारात विरूध्द दिशेने येत असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार भुमिंद्र पटले व त्याची पत्नी निता भुमिंद्र पटले हे दोघे जण दुचाकीसह एसटी बसच्या खाली सापडले. त्यामुळे दोन्ही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. जखमींना तुर्त उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद  गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. एसटी चालकाने विपरीत दिशेला असलेल्या वाहनाला धडक का दिली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.