‘समृद्धी’वर पुन्हा भीषण अपघात; तीन जण ठार

0
11

वाशीम : समृद्धी महा मार्गावरील मालेगाव तालुक्यातील रिधोरा इंटर चेंज जवळ होंडाई क्रेटा कार संभाजीनगर वरून अमरावती कडे जात असताना चालकाला डुलकी लागल्याने गाडीचे नियंत्रण सुटले. कार उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच १५ जे सी ९६९५ वर धडकली. धडक एव्हढी जोरदार होती की कार मधीच दोघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली.प्राप्त माहिती नुसार ट्रक क्र. एम एच १५ जे सी ९६९५ समृद्धी महामार्गवरील रिधोरा इंटर चेंज जवळ रस्त्याच्या कडेला उभा होता. मागील दिशेने अमरावती कडे जात असलेल्या हुंडाई कार चालकाला डूलकी लागून नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रकला अतिशय वेगाने मागून धडकली. अपघात एव्हढा भीषण होता की कारचा अर्धा भाग ट्रक च्या मागे घुसला होता.यामध्ये कार मधील सादल काजी, आलम हुसेन (कर अधिकारी)हे मयत झाले तर आरिफ खान हे गंभीर जखमी असून त्यांना वैद्यकीय उपचाराकरीता रुग्णवाहिकेच्या मदतीने मालेगाव ग्रामीण रुग्णालय येथे दखल केले असता त्याचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ए पी आय दांदडे, पीएसआय मोरे व मालेगाव पोलीस स्टेशचे अधिकारी कर्मचारी, रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाले.अपघात ग्रस्त वाहन घटनास्थळ येथून मालेगाव पोलीस स्टेशन येथे आणण्याची प्रक्रिया सुरु होती.