मनुस्मृतीवर बंदी व मनुचा पुतळा हटविण्याची दलित अधिकार आंदोलनाची मागणी

0
12
*मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन सादर
भंडारा -: केवळ पाठ्यपुस्तकातील श्लोकच नव्हे तर स्त्रियांची गुलामगिरी व जातीय विषमता, शोषणाची शक्ती करणाऱ्या संविधान विरोधी मनुस्मृतीवर देश पातळीवर बंदी आणण्याचा तसेच राजस्थान मधील जयपूरच्या उच्च न्यायालयासमोरील मनुचा पुतळा तातडीने हटविण्याचा केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव तातडीने राज्य विधानसभेत मंजूर करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय दलित अधिकारांदोलन महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा भंडाऱ्याचे वतीने एका शिष्टमंडळाद्वारे करण्यात आल्याची माहिती डीआरएचे राज्य सहसचिव व भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी दिले.
     राज्यव्यापी आव्हानानुसार वरील मागणीचे निवेदन दिनांक 3 जून 2024 ला माननीय योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व माननीय अजित पवार यांच्या नावे एका शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.
    शिष्टमंडळात दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव व भाकपचे जिल्हा सचिव काॅ. हिवराज उके तसेच कॉम्रेड शिवकुमार गणवीर कॉम्रेड सदानंद ईलमे काॅ. गजानन पाचे कॉम्रेड भगवान मेश्राम कॉम्रेड ताराचंद देशमुख यांचा समावेश होता.