खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू,येरंडी देवी येथील घटना

0
50

अर्जुनी मोर.-अर्जुनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील मौजा येरंडी देवी येथील 45 वर्षीय महिला शेतातील पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू पावल्याची घटना 19 ऑगस्टला सायंकाळी 5:30 वाजता घडली. रेवता घनश्याम तवाडे वय 45 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येरंडी देवी येथील रेवता घनश्याम तवाडे ही आपल्या शेतात शेत कामासाठी गेली होती.अशातच रेवता तवाडे 14 ते 15 फूट खोल खड्ड्यांमध्ये पडून तिचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत रेवता घरी न आल्याने घराशेजारील सर्वांनी तिचा शोध सुरू केला. घरामध्ये अंधार असल्याने इकडे तिकडे तिला शेजारी पाहू लागले. यातच ते आपल्या भावांना राखी बांधायला गेली असावी अशी कल्पना शेजा-यांच्या मनात आली. तिचे पती जंगलातून शेळ्या घेवुन घरी आल्यानंतर त्यांनी सुद्धा तिची शोधा शोध केली.एवढेच नाही तर जवळच असलेल्या चान्ना गावात येऊन नातेवाईकांकडे विचारपूस केली. रेवताबाईचा शोध न लागल्याने तो पुन्हा परत गेला.आजूबाजूला शेतात पाहिलं शेतातल्या लागून असलेल्या तलावात गावातील काही लोकांना घेऊन शोधाशोध केली.आजूबाजूला कुठेतरी आपली पत्नी दिसेल यासाठी त्यांनी गाव पालत केलं रात्र नऊ वाजेपर्यंत शोध चालू असता गावातील काही लोकांना घेऊन बटईने केली असलेली जमीन वासुदेव मेश्राम यांच्या शेताकडे गेले.आणि ज्या ठिकाणी खोल खड्डा खोदलेला होता त्यात पूर्णपणे पाणी भरलेले होते. या पाण्यामध्ये शोध घेण्यात आला.बांबूच्या साहाय्याने त्या खड्ड्यात पाहणी केली असता रेवता बाईच्या खांद्यावरील दुपट्टा पाण्याच्या वर आला. त्यानंतर चारी बाजूने पाण्यामध्ये बास टाकून पाहीले असता रेवताबाईचे मृतदेह वर आले. तात्काळ ही  पोलीस स्टेशन अर्जुनी मोरला  माहिती देण्यात आली. पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. रात्रौ दहा वाजे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे पाठविण्यात आले. दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रेवताबाई तवाडे यांचे शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. मृत्तक रेवताबाईला पती, एक विवाहित मुलगी व एक मुलगा असून त्यांच्या आकस्मिक मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.