गोंदिया,दि.२३ः- गोंदिया शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या छोटा गोंदिया परिसरात २२ आॅगस्टच्या रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास एका युुवकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.त्या युवकाचे नाव विक्की फरकुंडे असे असून आरोपीमध्ये २ अल्पवयीन(विधीसंघर्ष) मुलासह एका युवकाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक शहर पोलिसांची पथक आरोपींचा शोध घेत आहे.यातील एका आरोपीला पकडण्यात आले असून दोघांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.