अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ७६ वर्षीय आरोपीला अटक

0
211
अकोला,दि.२३ः- अकोट रोजी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र व विशेष न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अप. क्र. ८५/२०२४ भादविचे कलम ३७७ सहकलम ३.४ पोक्सो मधील आरोपी मो. अब्दुल लतीफ अब्दुल रहेमान, वय ७६ वर्ष, राहणार धारोळी वेस,अकोट ता.अकोट, जि. अकोला याने ९ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल झाल्याच्या नंतर आरोपीचा जमानत अर्ज आज दि.२२.८.२०२४ रोजी नामंजुर केला आहे. वरील आरोपी या प्रकरणात अकोला कारागृहात दि. २९.२.२०२४ पासुन बंदीस्त आहे.
    या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध करतांना न्यायालयात लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला की, या प्रकरणात आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले असून दि.२९.०२.२०२४ रोजी ९ वर्षीय पीडित मुलाच्या वडीलांनी पोलीस स्टेशन अकोट शहर येथे या आरोपी विरुध्द फिर्याद दिली की, दि. २७.०२.२०२४ रोजी ९ वर्षीय पीडित मुलगा रौजाण्याच्या पायरीवर बसलेला असतांना आरोपी अब्दुल लतीफ (दादाजी) याने पीडित मुलाला म्हटले की, तुझे अब्बु कुठे काम करतात हे तुला दाखवतो असे म्हणुन या प्रकरणातील आरोपी दादाजीने पीडित मुलाला अंजनगाव रोडचे असलेल्या बाजुला झाडा झुडपात नेते व तेथे या पीडित मुलाशी अनैसर्गिक संभोग केला आणि धमकी दिली की ही गोष्ट कोणाला सांगीतली तर तुला सोडणार नाही. या रिपोर्ट नुसार वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व चौकशी अंती दोषारोप पत्र आरोपी विरूध्द दाखल करण्यात आले. या प्रकरणात आरोपी विरूध्द शिक्षा देण्याइतपत सबळ पुरावे दोषारोप पत्रामध्ये उपलब्ध आहे. या आरोपीला जामीन दिल्यास तो फिर्यादी व इतर साक्षीदारावर दबाव आणू शकतो. या प्रकरणात पीडित बालक याचे बालकल्याण समिती समक्ष व कलम १६४ प्रमाणे न्यायालया समक्ष बयाण देखील नोंदविण्यात आले आहे. व पीडित बालकाचा जन्माचा दाखला देखील प्राप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीची शारीरीक तपासणी केली असता तो संभोग करण्यात समर्थ आहे. असे वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले आहे. याच आरोपी विरुध्द याच विद्यमान न्यायालयात विशेष खटला क्र. ३६/२०२० गुन्हा क्र.६९१/२०२० पोक्सो ॲक्ट प्रमाणे अकोट येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खटला दाखल असून ते प्रकरण पुराव्याला लागलेले आहे. यावरुन आरोपी हा विकृत मनोवृत्तीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जर कारागृहातुन जामीनावर सोडले तर परीसरातील इतर अल्पवयीन मुला मुलींच्या जीवाला धोका संभवतो. या गंभीर प्रकरणात आरोपीला कारागृहातच ठेवून दोन्ही खटले जलद गतीने सरकारी वकील चालविण्यास तयार आहे. या प्रकरणामध्ये जन्मठेपे सारखी कठोर शिक्षा प्रस्तावित असल्याने आरोपीचा जामीन अर्ज कृपया नामंजुर करावा असा युक्तीवाद जमानत अर्जाला विरोध करतांना सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला, व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर वि. न्यायालयाने  आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.