सहावर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न; महिलेस पकडले

0
30
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बुलढाणा-सहा वर्षांच्या चिमुकल्यास पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित महिलेस ग्रामस्थांनी पकडले. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथे १० सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजता ही घटना घडली.
पातुर्डा खुर्द येथील साई श्याम म्हसाळ हा बालक शिकवणी वर्गातून घराकडे जात असताना दिगंबर वाघ यांच्या घरासमोर ३० वर्षीय महिला साई यास पळवून नेऊ लागली. मात्र सोबत असलेली साईची बहीण व अन्य महिलांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ मदतीला धावले. संशयित महिलेस पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पातुर्डा पोलीस चौकीमध्ये बसवून ठेवल्यानंतर महिलेस तामगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलीस उपनिरिक्षक विलास बोपटे यांच्यासह सहकाऱ्यांनी महिलेस चालविले असता जनतेच्या रोषाला पोलिसांना सामना करावा लागला. तर म्हसाळ कुटुंब व नातेवाइक तामगाव पोलीस ठाण्यात ठाम मांडून होते.महिला वेगळीच भाषा बोलत असल्याने ती काय म्हणते हे समजणे पोलिसांना अवघड झाले आहे.