अर्जुनी मोरगांव- तालुक्यात आलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक लहान, मोठे तलाव, बोळी व नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यातच तालुक्यातील खांबी या गावामध्ये १० सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास दोन घरे कोसळून पडले,मात्र कोणतीही जिवितहानी नाही.अनुसया महादेव ऊरकुडे व अशोक महादेव ऊरकुडे यांचे घर पावसामुळे कोसळले तेव्हा हे सर्व घऱातच होते.अशोक महादेव ऊरकुडे यांच्या घरी त्यावेळी माणूस म्हणून कुणी नसून घरामध्ये असलेली सर्व भांडी व इतर कुटुंब वापराचे साहित्य तिथे असलेल्या नागरीकांनी काढून मदत केली.सदर पडलेल्या घराचे संबंधित अधिकारी व प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी.