आमगाव शहरात चोरांचा धुमाकूळ,पोस्ट ऑफीसचे लॉकर गॅस कटरने फोडली

0
313

# वाहनांच्या चोरी ! तर आता बँक एटीएम लॉकर यांना लक्ष
# नगरात सीसीटीव्ही यंत्रणा फोल ठरली
आमगाव :– जिल्यातील शांतपूर्ण असलेल्या आमगाव शहरातील अनेक नगरात चोरांनी धुमाकूळ घातला आहे.१२ जुलै च्या मध्यरात्री चोरांनी रिसामा येथील पोस्ट ऑफीस मधील लॉकर ला लक्ष करीत गॅस कटरने फोडून चोरीचा प्रयत्न केले.तर शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घालत दुचाकी चोरीचा सत्र सुरू केला आहे.
आमगाव शहरात अनेक ठिकाणी चोरांनी धुमाकूळ घालत चोरीचा क्रम कायम ठेवला आहे.तर भर दिवसा गर्दीच्या थकानावरून दुचाकी वाहने चोरटयांनी नागरिकांच्या मनात दम भरला आहे. त्यामुळे नागरिक चोरांच्या भीतीमुळे वैतागले आहे.
तहसिल कार्यालय,बँक परिसर,शाळा महाविद्यालय परिसर तर खाजगी रुग्णालय या ठिकाणी दुचाकी वाहने चोरांनी आपले लक्ष साधत चोरीला गती दिली आहे.
१२ जुलै च्या मध्यरात्री चोरांनी रीसामा परिसरात असलेले पोस्ट ऑफीस ला लक्ष करीत चोरीचा प्रयत्न केला. पोस्ट ऑफीस च्या दारावरील कुलूप तोडून आत शिरले व ऑफीस मध्ये ठेवलेली लॉकर गॅस कटरने फोडली . परंतु लॉकर रिकामे असल्याने चोरांना रोख रक्कम मिळाली नाही.त्यामुळे मोठे संकट यावेळी टळले. शहरात अनेक ठिकाणी चोरांनी आता बँक, एटीएम यांना लक्ष केले आहे.तर चोरीसाठी उच्च तंत्र वापरण्यात येत आहे.त्यांनी घरात द्वारा ला कुलूप गॅस कटरने तोडून आत शिरत आहेत . घरातील लोखंडी अलमारी ,लॉकर ला गॅस कटरने फोडून चोरी करीत असल्याने नागरिक या प्रकारामुळे धास्तावले आहेत.
आमगाव येथे शहरात अनेक ठिकाणी व्यावसायिक यांच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.परंतु यांचे सुयोग्य नियोजन व देखरेख नसल्याने ते बंद पडली आहे.शहरातील मुख्य मार्गावर या सीसीटीव्ही कॅमेरे आता लागूनही उपयोग होत नसल्याने ही यंत्रणा फोल ठरली आहे. चोरांचा सुगावा लावण्यासाठी शहरातील हेच सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा प्रभावीपणे कार्य करतात. या सीसीटीव्ही कॅमेरे योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आर्थिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
#आठवडी बाजार ठरतो चोरांसाठी सोईचा :-आमगाव परिसरात अनेक ठिकाणी चोरांना आठवडी बाजार हा सोइचा ठरत आहे. मध्यप्रदेश छत्तीसगड सीमा लागून असलेल्या आमगाव येथील आठवडी बाजार गर्दीचा ठिकाण आहे.या गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटी टोळी मुक्काम येत असल्याचे निदर्शनास आले आहे.तेच अनेक भागातील टेहाळणी करून रात्रपाळीत चोरीचा प्रयत्न करतात.शुक्रवारला आठवडी बाजार असल्याने अनेक नगरात फेरीवाल्यांचे गर्दी तर भिक मागणाऱ्यांची रिग दिसून येते.अश्या स्थालांतरित वेक्तींचा सुगावा घेणे गरजेचे आहे.