तिरोडा,दि.१५:- गोरेगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत दवनीवाडा मंडळाअंतर्गत येणा-या ग्राम पंचायतिच्या समस्या मार्गी लावण्याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी ग्रा.प.दवनीवाडा येथे आढावा बैठक आयोजीत केली यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल व अकुशल कामांचा आढावा तसेच गावामध्ये उद्भवणा-या समस्यावर चर्चा करण्यात आली तसेच पंतप्रधान आवास योजना / पीएम मोदी आवास योजना, ०९ सप्टेबर रोजी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांतील शेतीचे व घरांचे पंचनामे करणे, संजय गांधी/श्रावण बाळ योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे प्रकरण मार्गी लावणे, पूरग्रस्त भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, रेशन कार्डधारकांच्या समस्या मार्गी लावणे इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्यात आला या बैठकिमध्ये प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जी.प.सदस्य विजय उईके, अंजली अटरे, प.स.उपसभापती निरज उपवंशी, उपविभागीय अधिकारी खंडाईत, गटविकास अधिकारी पिंगळे,भाजप दवनीवाडा मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे, प.स.सदस्य शंकर टेंभरे, मा.प.स.सदस्य प्रकाश पटले, सरपंच अशोक उईके, विकास शेंद्रे, प्रकाश कटरे,लक्ष्मी श्रीबांसरी, आरती नागपुरे, नरेंद्र टेंभरे, भोजू सुलाखे, तसेच संबधीत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व नागरीक उपस्थित होते.