गोंदिया,दि.०१-तिरोडा तालुका अंतर्गत येत असलेल्या इंदोरा(खुर्द) येथील महिला सरपंच सरीता सुनिल तुमसरे यांना आज १ आॅक्टोंबरला पाच हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेेहाथ पकडले असून तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तक्रारदार हे इंदोरा(खुर्द) येथीलच रहीवासी असून ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे मार्च ते जून या चार महिन्याचे मानधन ५३२०० रुपयाचा धनादेश ग्रामसेवक यांननी स्वतःची स्वाक्षरी करुन तक्रारदाराकडे दिला.तक्रारदार त्या धनादेशावर स्वाक्षरीकरीता सरपंचाकडे गेले असता त्यांना पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.त्या तक्रारीच्या आधारे आज मंगळवारला सापळा रचून महिला सरपंच सरीता तुमसरे यांना पाच हजार रुपये पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.