24 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home गुन्हेवार्ता मुलानेच केली जन्मादात्या आईची निर्घृण हत्या, नंतर स्वतालाही संपवलं

मुलानेच केली जन्मादात्या आईची निर्घृण हत्या, नंतर स्वतालाही संपवलं

0
192

गोंदिया- जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. यात जन्मदात्या आईची हत्या आणि त्यानंतर मारेकऱ्याने आत्महत्या केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. यात दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध आईकडे पैसे मागितले आणि तिने पैसे न दिल्याने आईवर कुऱ्हाडीने वार करून खून केला असल्याचा थराराक प्रसंग घडला आहे. या हत्येनंतर आरोपी मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या देखील केली आहे. या घटनेनंतर मात्र परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक आईचे नाव सुलकनबाई बनोठे (वय वर्ष 75) तर लेखराज बनोठे (वय वर्ष 54) असे आरोपी मृतक मुलाचे नाव आहे. सुलकनबाई बनोठे व तिचा मुलगा लेखराज बनोठे हे एकत्र राहत होते. रात्री लेखराज बनोठे याने आई सुलकनबाई हिला दारू पिण्याकरिता पैसे मागितले. मात्र आईने पैसे न दिल्याने मुलाने रागाच्या भरात आईवर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. यात सुलकनबाई गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आईचा मृत्यू झाल्याचे आरोपी मुलाला कळताच आरोपी मुलाने देखील घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती आज(शनिवार) सकाळी सालेकसा पोलिसांना मिळाल्यानंतर घटनेची नोंद करण्यात आली आहे.