अर्जुनी मोर.-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार इंजी. राजकुमार बडोले हे सन 2009 पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी आमदार व कॅबिनेट मंत्री म्हणून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील व महाराष्ट्राचा विकास केला. राजकुमार बडोले यांच्याकडे विकासाचा मोठा व्हिजन असल्यामुळे या क्षेत्राचा सामाजिक धार्मिक व पर्यटन विकास साधण्यासाठी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन भाजपाचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांनी केले.
महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ तारीख 15 बोंडगाव देवी येथे आयोजित प्रचार सभेत लायकराम भेंडारकर बोलत होते. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेल्या व नैसर्गिक सौंदर्याने बहरलेल्या अर्जुनी मोरगाव विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान्याच्या सौंदर्यासाठी हिलटॉप गार्डन बडोले साहेबांची देण आहे. सोबतच प्रतापगड या ऐतिहासिक तीर्थक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास केला. काळीमाती धम्म कुटी इथेही मोठ्या प्रमाणात निधी देऊन कामे करण्यात आली. मागील आपल्या आमदारकीच्या व मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या इमारतीसाठी साडेतीन करोडचा निधी आणून सुसज्ज इमारत आज उभी आहे. अर्जुनी मोरगाव येथे सुसज्ज असे बसस्थानक बडोले साहेबांच्या कार्यकाळात तयार झाले आहे. अर्जुनी मोरगाव येथे दिवाणी न्यायालयाच्या इमारतीसाठी बडोले साहेबांनी निधी मंजूर करून आणला तर ग्रामीण रुग्णालयाच्या समोर व न्यायालयाच्या बाजूला तयार होत असलेल्या मुला-मुलींच्या निवासी शाळा व वस्तीगृहासाठीही मोठ्या प्रमाणात निधी आणून आज त्या ठिकाणी सुसज्ज अशा वस्तीगृहाच्या इमारती चे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. तर बरडटोली अर्जुनी मोर. येथील संविधान चौकाच्या बाजूला निवासी शाळेसाठी करोडो चा निधी आणून आज प्रशस्त इमारत डौलाने उभी आहे. कोहमारा – वडसा रोड साठी मोठ्या प्रमाणात निधी आणून आज तो रस्ता सुसज्ज झालेला आहे. अशी कितीतरी कामे बडोले साहेबांच्या हातून या क्षेत्रात झालेली आहे .आणि अशा विकास पुरुषाला आपण सरळ हाताने घडी चिन्हाची बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.
या सभेला खासदार प्रफुलभाई पटेल, यशवंत गणवीर, दानेश साखरे ,लोकपाल गाहाणे किशोर तरोणे , राधेश्याम झोळे,मंजुषा बारसागडे ,गीता ब्राह्मणकर, डॉ. गजानन डोंगरवार, अभय फुल्लुके, कृष्णा झोडे,अँड.श्रिकांत बनपुरकर,भाग्यवान फुल्लुके, यादवराव बोरकर ,शालिक बोरकर ,रवी बनपुरकर, राकेश लंजे तथा भाजप व राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्यकर्ते ,पदाधिकारी तथा मतदार बंधुभगीणी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.