तिरोडा विधानसभा मतदारसंंघात तुतारी कुणाला टोचणार काही खरं नाही- माजी मंत्री गौरीशंकर बिसेन

0
423

गोंदिया,दि.१५ः महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका येत्या २० नोव्हेंबरला पार पडत असून गोंदिया जिल्ह्यात प्रचाराला जोर आलेला आहे.राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरीता बालाघाट जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी गल्लोगल्ली प्रचाराचा धुमधडाका चालविला आहे.त्यातच आज गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचाराकरीता येथील पोवार बोर्डींग येथे भाजप महायुतीला माणनार्या पोवार समाजातील मतदारांची सभा घेण्यात आली.या सभेला संबोधित करतांना मध्यप्रदेशचे माजी मंत्री गौरीशंकर बिसेन यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघातील सर्व पोवार बांधवानी आपल्या सर्व नातेवाईकांना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करतानांच तिरोडा विधानसभा मतदारसंघात आपल्याला प्रचाराची जबाबादारी देण्यात आली होती.या मतदारसंघात प्रचार करतांना महायुतीकडून आपल्या भाजपचे विजय रहागंडाले हे निवडणूक रिंगणात असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे कुणी गुड्डू बोपचे हे रिंगणात असून त्यांचे निवडणूक चिन्ह हे तुतारी असल्याचे कळले.त्यांचे चिन्ह बघून आपणास काही समजले नाही,मात्र तिरोडा मतदारसंघातील ही तुतारी कुणाला टोचणार हे मात्र कळायला मार्ग नसल्याचे उदगार माजी मंत्री बिसेन यांनी या सभेत केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.यावरुन तिरोडा मतदारसंघातील निवडणूक ही अतीतटीची झाल्याची स्पष्ट कबुलीच गौरीशंकर बिसेन यांच्या या सभेतील वक्तव्यावरुन दिसून येत आहे.

येथील पोवार बोर्डीगं येथील सभेत बोलत असतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.या सभेला बालाघाट-सिवनी खासदार श्रीमती भारती पारधी,कटंगीचे आमदार गौरव पारधी,माजी मंत्री गौरीशंकर बिसेन,पवार प्रगतिशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती,माजी अध्यक्ष राजेश चव्हाण,पवार प्रगतीशिल मंचचे माजी अध्यक्ष राजेश राणे,माजी नगरसेविका श्रीमती बिसेन,माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे,बालाघाटचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्री अग्रवाल,डाॅ.प्रशांत कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कटंगीचे आमदार गौरव पारधी यांनीही तिरोडा मतदारसंघात महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.यावरुन ही सभा गोंदिया मतदारसंघाकरीता होती की तिरोड्याकरीता याचीच चर्चा होती.