गोंदिया : जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ( ता. १७) सायंकाळच्या सुमारास घडली. राकेश भांडारकर बक्कल क्र. १७४२ ( वय ३० रा. पोलीस कॉलनी, मनोहर चौक, गोंदिया) असे त्या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.मृत राकेश हा गोंदिया पोलीस दलात कार्यरत होता. दरम्यान,सकाळी १० वाजता कर्तव्यावर हजर झाल्यानंतर ६ वाजेपर्यंत त्याची ड्युटी होती. त्यातच कर्तव्य पार पाडत असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृत राकेश याने स्वतःवर गोळी झाडली. यात त्याच्या तोंडाखाली गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत राकेश याला १ मुलगा व १ मुलगी असे दोन आपत्य आहे.