3 पिस्तुल, 18 जिवंत काडतुसांसह 5 आरोपींना अटक

0
144
बल्लारपूर,दि.०५ : बल्लारपूर पोलिसांनी साईबाबा वार्ड बल्लारपूर व फुकटनगर बामणी येथून 3 पिस्तुल व 18 जिवंत काडतुसांसह 5 आरोपींना अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. 4) करण्यात आली. मुकेश विश्वनाथ हलदर (28),अमित दिलीप चक्रवर्ती (34),जितेंद्रसिंग गोविंदसिंग ढिल्लोन (29), संघर्ष बंडू रामटेके (27), काश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी (20) अशी आरोपींची नावे आहेत.
बल्लारपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार साईबाबा वॉर्ड बल्लारपूर व फुकट नगर बामणी येथे पिस्तुल व जिवंत काडतुसे सापडली आहेत. माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांचे इंटेलिजन्स ब्युरोचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून 97 हजार रुपये किमतीची तीन पिस्तूल आणि 18 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रमांक-1091/2024 कलम-3/25 आर्म ऍक्ट आणि गुन्हा क्रमांक. कलम 1093/2024 कलम-3/25 शस्त्रास्त्र कायद्यान्वये आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील गाडे, सहायक पोलिस निरीक्षक अंबादास टोपले, उपनिरीक्षक हुसेन शहा, आनंद परचाके, सुनील कामतकर, पोलिस अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम रणविजय ठाकूर, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सत्यवान कोटनाके, कविता विकास जुमनाके, शरदचंद्र करुष, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, लखन चव्हाण, मिलकर चव्हाण, मिलिंद चव्हाण, भूषण टोंग, भास्कर चिचवलकर, अनिता नायडू आदीनी पार पाडली.