गोंदिया,दि.०५ः- आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदियाच्यावतीने येत्या शनिवार ७ डिसेंबरला सायकांळी ६ वाजता साईमंगलम लाॅन छोटा गोंदिया येथे श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त सत्यशोधक किर्तनकार, समाजप्रबोधनकार सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष मुकेश पाटील राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून सचिव विजय सुपारे व माधुरी नासरे,पायल भेलावे,माधव भेलावे राहणार आहेत.कार्यक्रमाला जि.प.अध्यक्ष पकंज रहागंडाले,जि.प.सभापती संजय टेंभरे,रुपेश कुथे,श्रीमती पुजा सेठ,पवार प्रगतीशिल मंचचे अध्यक्ष एड.पृथ्वीराज चव्हाण,धोबी समाज अध्यक्ष मनिष कनोजिया,माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे,ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,दिपक कदम,मुकेश शिवहरे,सरपंच उषा बावनकर,राजेश कनोजिया,पकंज यादव,ओबीसी अधिकार मंचचे अध्यक्ष खेमेंद्र कटरे,धनगर समाज अध्यक्ष जगदिश पडोळे,माजी नगरसेवक अशोक गुप्ता,शिव शर्मा,मुकुंद देवडे,प्रेम जायस्वाल,आशा पाटील,अमर वराडे,डाॅ.सुरेश पाटील,राजीव ठकरेले,राजकुमार पटले,अजय पडोळे,नाभीक समाजाचे अध्यक्ष अशोक चन्ने,आर.आर.अगडे,माळी समाज अध्यक्ष राजेश नागरीकर,सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर,कुणबी समाज अध्यक्ष मनोज मेंंढे,आदिवासी समाज अध्यक्ष विनोद पंधरे,लिलाधर पाथोडे,रमेश ब्राम्हणकर,करण टेकाम,अनिल वट्टी,चंद्रभान तरोणे,गोपाल अजनीकर,सुनिल तिवारी,शिंपी समाज संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश भिवगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सर्व समाजबांधवानी सत्यपाल महारांजाचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व धर्म पंथ संप्रदायातील विविध समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदियाच्यावतीने करण्यात आले आहे.