गुन्ह्यात चोरीस गेलेला सोन्याचा व नगदी असा अंदा. किमती 21 लक्ष रुपयांचा मुद्येमाल हस्तगत…
स्था. गु. शा. गोंदिया व तिरोडा पोलीस पथकास आरोपी व दागिणे हस्तगत करण्यात मोठे यश
गोंदिया,दि.०६– दिनांक – 07/11/2024 चे रात्री 20.00 वाजता ते रात्री 22:00 वाजता चे सुमारास श्दिलीप बनसोड यांचे राहते घरी कोणीही हजर नसतांना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व नगदी असा किमती 18,47,500/- रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे फिर्यादी सोमप्रकाश फुलचंद बीसेन वय 42 वर्षे राहणार- मेंढा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया (चालक) यांच्या तक्रारी वरून पो.ठाणे तीरोडा येथे अपराध क्रमांक- 827/2024 कलम 331(4), 305 (अ) भा. न्याय संहिता- 2023 अन्वये दिनांक 08/11/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
नमूद घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी . साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. गोंदियाचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे तसेच पोलीस निरीक्षक. अमित वानखेडे, पो ठाणे तिरोडा यांचे नेतृत्वात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचे शोध व आरोपीतांना जेरबंद कऱण्याकरीता वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती.स्था.गु.शा. व तिरोडा पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार अज्ञात चोरटे आरोपीतांचा शोध घेत असताना घटनास्थळ वरून प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनिय माहीतीच्या आधारे– दिनांक 10/11/2024 रोजी संशयावरून आरोपी नामे रामन्ना उर्फ रामचंद्र पोचन्ना ठाकरे वय 35 वर्षे राह. देसाईगंज वडसा यास ताब्यात घेवुन जेरबंद कऱण्यात आले होते….गुन्ह्याचे अनुषंगाने त्यास सखोल चौकशी विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी करणारा मुख्य सूत्रधार अट्टल चोरटा आरोपी नामे विष्णू खोकण विश्वास वय 34 वर्षे राह. अरुण नगर, तालुका अर्जुनी- मोरगाव जिल्हा गोंदिया* असे असल्याचे सांगितले……अश्या प्राप्त माहिती वरुन पथके मुख्य सूत्रधार अट्टल आरोपी चा साधारण मागील एक महिन्या पासुन जिल्ह्यात तसेच भंडारा, नागपूर जिल्ह्यात तसेच तेलंगणा, छत्तीसगड राज्यात शोध घेवून अखेर मुख्य चोरटा आरोपी क्रं. विष्णु विश्वास यास देसाईगंज/ वडसा येथून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले.. असुन गुन्ह्याचे अनुषंगाने त्यास केलेली विचारपूस तपास चौकशी दरम्यान गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्याचे ताब्यातून नमूद घरफोडी गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे. नमूद आरोपी पासून गुन्ह्यात एकूण 4 नग सोन्याचे बिस्कीट ज्यावर इंग्रजीत (SHALIMAR 9950 FINE GOLD) असे कोरलेले व एक जुनी वापरती पल्सर गाडी व आरोपी क्रं. 1 पासून नगदी 24,500/- रूपये असा साधारण 21 लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इतरत्र घरफोडी चे गुन्हे तसेच नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपी यास सखोल विचारपूस चौकशी करण्यात येत आहे….गुन्ह्याचा अधिकचा तपास सपोनि मसराम पो . ठाणे तिरोडा करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, गोंदिया, गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, . साहील झरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिनेश लबडे, पो.नि. अमित वानखेडे यांचे मार्गदर्शनात पथकातील पोलीस अधिकारी स.पो.नि. मसराम, वनिता सायकर, श्रेणी पो. उप. नि गोपाल कापगते, पो.अंमलदार तुलसीदास लुटे, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, स्था.गु.शा. यांनी तसेच पो ठाणे तिरोडा येथील पो. हवा. दिपक खांडेकर, खराबे, ठाकरे, गायकवाड तसेच तांत्रीक सेल गोंदिया चे स.पो.नि. ओमप्रकाश गेडाम, पो. अंमलदार संजु मारवाडे, योगेश रहीले, रोशन येरणे यांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी कामगिरी केलेली आहे.