हायवेलगतच्या दरीत ट्रेलर कोसळल्याने चालकाचा मृत्यू

0
100

सडक अर्जुनी,दि.१०ः तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील देवपायली जवळील शशीकरण मंदिराजवळील खोल दरीत ट्रेलर कोसळल्याने ट्रेलरचालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज १० डिसेंबर रोजी सायकांळला ५ वाजेच्या सुमारास घडली.रायपूरकडूंन नागपूरच्या दिशेने जात असलेला 16 चाकी ट्रेलर CG 22 J 7303 ने मोटरसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात सर्व्हिस रोडवर बेरिगेट नसल्यामुळे ट्रेलर खोल दरीत कोसळल्याने ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. भूपेंद्र अंबरनाथ यादव वय 35,रा.भिलाई असे मृत चालकाचे नाव आहे.घडचनेची माहिती मिळताच डुग्गीवर पोलीस स्टेशन व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.