गडचिरोली दि ११ आज दुपारी अंदाजे तीन वाजता सुमारास गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या सुरक्षा बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एका पोलीस गार्डने स्वतःच्या बंदुकीचा वापर करून पोटात सहा गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर न्यायालय परिसरात फारच मोठा गोंधळ उडाला होता. सुरुवातीला या पोलीस गार्डचे नाव स्पष्ट झालेले नाही. आणि तेथील नागरिकांनी तात्काळ प्रतिक्रिया देत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमाजी होळी असे तैनाती सुरक्षा गार्डचे नाव आहे.
या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक किंवा मानसिक तणावामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस विभाग आणि न्यायालय प्रशासनाने घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, न्यायालय परिसरातील नागरिक आणि कर्मचारी या घटनेने हादरले आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे पोलिसांच्या मानसिक ताणतणावावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे.