36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू

स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू

0
95

blank

बुलढाणा : बुलढाणा-चिखली राज्य मार्गावर आज झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. बुलढाणा नजीकच्या येळगाव नजीक एका शैक्षणिक संस्थेची बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. आज बुधवारी, ११ डिसेंबर रोजी झालेल्या या दुर्देवी अपघातात येळगाव जवळील आश्रम शाळेजवळ ही घटना घडली. अपघातात ठार झालेला तरुण हा बुलढाणा तालुक्यातील खूपगाव येथील रहिवासी असून जिवन इंगळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बुलढाणा नजीकच्या सागवान येथील शिवसाई ज्ञानपीठ संस्थेची बस आणि मोटरसायकलची समोरासमोर धडकून हा अपघात झाला. अपघात झाल्यावर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. अपघातात दुचाकीची मोडतोड होऊन युवक जागीच दगावला. काही जवाबदार नागरिकांनी घटनेची माहिती बुलडाणा शहर पोलिसांना दिली. शहर पोलिसांच्या पथकाने तात्काळ येळगाव गाठून घटनास्थळचा पंचनामा केला.

blank