ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

0
159
साकोली,दि.१३ः- साकोली बस स्थानक समोरुन इलेक्ट्रिक गाडीने जाणार्या तीन मित्रांना ट्रॅक्टरच्या मागील भाग डोक्याला घासून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता घडली.भावेश नारायण ब्राह्मणकर असे मृत्य विद्यार्थ्याचे नाव असून,तो चिचटोला पळसगाव येथील रहिवासी आहे.
भावेश ब्राह्मणकर(१९) हा इलेक्ट्रिक गाडी डेल्टीकनने दोन मित्रांसोबत बस स्थानका समोरून जात असताना, ट्रॅक्टर क्र.३६ बी ९४५४ या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा मागील भाग भावेशच्या डोक्याला स्पर्शून गेल्याने, डोक्याला जबर मार लागला.त्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्याचे इतर दोन मित्र हे मात्र सुखरूप असून त्यांना कुठलीही जखम झाली नाही. भावेश साकोली येथील करंजकर कॉलेजमध्ये बी फार्मच्या प्रथम वर्षाला शिकत होता.त्याला आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या अपघाताचा तपास पोलीस हवालदार प्रमोद बागडे यांच्याकडे आहे.