अमरावतीच्या मुसैबची ‘एनआयए’कडून चौकशी सुरूच…

0
41
अमरावती,दि.१४ः जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएच्या पथकाने गुरुवारी पहाटे अमरावतीमधील मो.मुसैब शे. इसा (२३) याला ताब्यात घेतले आहे.
   गुरुवारी दिवसभर चौकशी करून सायंकाळी घरी सोडले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजे पासून त्याची पुन्हा चौकशी सुरू असून शुक्रवारी रात्री साडेसात वाजेपर्यंत ही चौकशी सुरूच होती.
    जवळपास २५ तासांच्या चौकशीनंतरही एनआयए चे अधिकारी ठोस निष्कर्षाप्रत पोहोचले किंवा नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मो.मुसैब शे.इसा हा मागील काही महिन्यां पासून एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असावा तसेच त्यांच्यासोबत सोशल मीडिया ग्रुपवर तो सहभागी असल्याचा संशय एनआयएला आहे.
    ‘एनआयए’ने गुरुवारी पहाटे देशभरात टाकलेल्या छाप्यांपैकी एक छापा मो. मुसैबच्याही घरी टाकला.मो.मुसैबच्या घरातून काही कागदपत्रे व त्याचा मोबाइलसुद्धा जप्त केला आहे. मात्र त्याचा दहशतवादी संघटनेमध्ये सहभाग आहे किंवा नाही, हे मात्र काल शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत समोर आले नव्हते. याबाबत एनआयएचे अधिकारी किंवा स्थानिक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही.