मोहाडी,दि.१४ः तालुक्यातील येत असलेल्या कांद्री वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत मागील अनेक दिवसापासून वाघाने शिकार केलेल्या आहेत. जांब-लोहारा मार्गावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाघाने केलेल्या डुकराची शिकार केल्याचे आढळून आले आहे.
ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये शिकार केलेला डुक्कर आढळून आला तो शेतकरी शेतात गेला असता, डुक्कर छिन्न विच्छिन्न अवस्थेत दिसून आला. डुकराच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आल्याने वाघानेच केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याने घटनेची माहिती वन विभाग कार्यालय कांद्री येथे दिली. सदर घटनेची माहिती मिळताच तेथील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी घटनांच्या ठिकाणी पाहणी केली. परंतु, त्या ठिकाणी वाघाचे पगमार्क आढळून आले नाही.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.