34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता दोन दुचाकीची अमोरासमोर धडक, एक ठार-एक जखमी

दोन दुचाकीची अमोरासमोर धडक, एक ठार-एक जखमी

0
141

blank

देवरी,दि.१५ः तालुक्यातील फुटाणा/पलानगाव मार्गावरील पदमपुर गाव शिवारात दोन दुचाकीची अमोरासमोर धडक झाल्याने या घटनेत एक दुचाकीस्वाराचा मृत्यू तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना १४ डिसेबंरला घडली.कलीराम नेताम (४५) राह. पदमपुर असे मृताचे तर, विशाल मडावी (१९) राह. कोसबी असे जखमीचे नाव आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील पदमपुर येथील कलीराम नेताम हा दुचाकी क्रमांक एम.एच.३५ बी ७६२९ ने जात असतांना कोसंबी येथील विशाल मडावी हा युवक दुचाकी क्र. सी.जी.०८आर.२११५ ने सिंदिबिरी कडून पदमपुर कडे येत असताना पदमपुर गाव शिवारातील वळणावरील पुलाजवळ दोन्ही दुचाकीची अमोरासमोर जबर धडक झाली. या घटनेत कलीराम नेताम यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल मडावी हा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी चिचगड ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे.

blank