36 वर्षीय नराधमाकडुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
273

मुंगली येथील घटना, नवेगाव/बांध पोलीसात गुन्हा दाखल,आरोपीची कारागृहात रवानगी

गोंदिया,दि.२२ःजिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या ग्राम मुंगली येथील साडे सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 36 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना दि.19 डिसेंबर 2024 ला उघडकीस आली असुन रजनीकांत कमलदास वालदे वय 36 रा.मुंगली ता.अर्जुनी/मोरगाव जि.गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की पिडीत मुलगी ही आपल्या मैत्रीणी सोबत दि.07 डिसेंबर 2024 ला दुपारी 12:00 वाजता दरम्यान दुसऱ्या मैत्रीणीच्या घरी खेळायला गेली.आणि सोबत खेळुन मैत्रीणी सोबत आरोपी रजनीकांत कमलदास वालदे याच्या घराच्या अंगणातुन घरी परत येत असतांना आरोपी रजनीकांतने पिडीत मुलीला वाईट उद्देश्याने उचलुन आपल्या घरी नेले आणि तिला आपल्या घरच्या खाटेवर झोपवुन अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असताना पिडीताने आरोपीच्या हाताचा चावा घेत व झटका मारुन दाराची कळी काढुन आपल्या घरी परत आली.पिडीत मुलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडीलांना सांगितले.आरोपी रजनीकांत हा पिडीत मुलीवर मागील 15 दिवसांपासुन अत्याचार करत होता.
पिडीत मुलीच्या घरच्यांनी नवेगाव/बांध येथील पोलीस स्टेशनला जाऊन पोलीसांना घटनेची माहिती दिली. नवेगाव/बांध पोलीसांनी आरोपी विरोधात कायमी अप क्रमांक 166/2024 कलम – 76 भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम – 08, 12 बाल लैंगिक अत्याचार प्र.का 2012 अंतर्गत नवेगाव/बांध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी रजनीकांत याला नवेगाव/बांध पोलीसांनी अटक करुन गोंदिया येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला भंडारा कारागृहात रवानगीचे आदेश दिले.तर सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी नवेगाव/बांध च्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले करीत आहेत.