ढासगडजवळ झायलो गाडीला धडक दिलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
84
देवरी,दि.२२ः– तालुक्यातील चिचगड ते कोरची या राज्यमार्गावर आज २२ डिसेंबरला सकाळी ८ वाजेच्या सुमारास झायलो गाडीला मोटरसायकलची धडक बसल्याने २३ वर्षीय मोटारसायकलस्वार चालक जागीच ठार झाल्याची घटना ढासगड नजिक घडली.या अपघाता मृत झालेल्या युवकाचे नाव मनीष परतेकी (२३) राह.पिपरखारी असे आहे.
कोरचीकडून चिचगडकडे येणाऱ्या रस्त्यावरील ढासगड जवळ झायलो गाडी क्रं.एम.एच.१२ जी.झेड.६७३६ रस्त्याच्या कडेला उभी असताना मोटारसायकलस्वार युवक हा आपल्या मोटर सायकलने पिपरखारीकडे जात असतांना दुचाकीचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, झायलो गाडीला जोरदार धडक दिली.या धडकेत मनीष परतेकी या युवकाचा जागीच घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच चिचगड पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय चिंचगड येथे हलविले.