जिल्ह्यातील शाळांची ६५ कोटीची आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम थकित-प्रा.आर.डी.कटरे

0
246

गोंदिया,दि.२२ :- जिल्ह्यतील खासगी शाळांची सरकारकडे प्रलबिंत असलेली आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम त्वरीत मिळावी या उ्ददेशाने स्थानिय लिटल वूड इंग्लिश स्कूल गोंदिया येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेला चेतन बजाज, श्री पालिवाल,श्री.जुनेजा,श्री.अग्रवाल,श्री चौहान,श्री लिल्हारे,श्री येळे तसेच इंग्रजी माध्यमचे संस्था संचालक उपस्थित होते.या सभेत आरटीई फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रा.आर.डी.कटरे यांनी आरटीई प्रतिपूर्ती संदर्भात न्यायालयात खटला सादर करण्याच्या संदर्भातून मार्गदर्शन करत संपूर्ण माहिती दिली.सभेत उपशिक्षणाधिकारी दिघोरे यांनी सांगितल्या प्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील अंदाजे एकूण 65 कोटी रुपये शैक्षणिक सत्र 2012-2013 ते सत्र 2024- 25 पर्यंतची आरटीईची रक्कम थकीत असल्याबाबतची माहिती दिली.त्याबरोबर जिल्ह्यात 126 इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून आरटीई अंतर्गत विध्यार्थ्यांना मोफत प्रवेश देतात.त्यापैकी मुंबई न्यायालयाने नागपूर बेंचच्या निर्णयानुसार नागपूरच्या न्यायालयात खटला सादर केलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पाच शाळेचे आरटीई प्रतिपूर्तीचे थकीत रक्कम रु.1,63,5,048 /-(एक कोटी त्रेसष्ठ लाख पाच हजार अठेचालीस ) चे निकाल लावत शिक्षण विभागाला सहा आठवड्यात लवकरात लवकर थकीत प्रतिपूर्ती शाळेला देण्याचे आदेश दिले.तसेच गोंदिया जिल्ह्यातील या पाच शाळे व्यतिरिक्त इतर खाजगी कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहाययित तत्वावर सुरु असलेल्या शाळा लवकरच आरटीई प्रतिपूर्ती संदर्भात न्यायालयात खटला सादर करणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आरटीई रूल सात डी नुसार आरटीईची प्रतिपूर्ती शाळांना पहिला हफ्ता ऑक्टोबर तर दुसरा हफ्ता सत्र शेवटी एप्रिल महिन्यात देण्याचे आदेश असल्याची माहिती दिली.