गोंदिया : गोंदिया शहरातील जुन्या रामनगर पोलिस ठाण्यात 24 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजताच्या सुमरास भिषण आग लागली.आगीत गुन्हे तपासात जप्त केलेल्या दोन कार जळून खाक झाल्या तर काही मोटारसायकल सुध्दा आगीच्या विळख्यात सापडल्या.येथील पोलीस ठाणे हे नवीन इमारतीत स्थानांतर झाले असून जप्तीतील वाहन मात्र जुन्या पोलीस ठाणे परिसरातच होते.त्यातच रात्री दरम्यान आग लागल्याने ही आग कशी लागली याचा तपास केला जात आहे.
त्यामुळे कुठलेही शासकीय दस्तावेजाचे नुकसान झाले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीची माहिती नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली असून अग्नीशमन विभागाचे दोन वाहन घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.