जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
परभणी, – ग्राहकांनी अतिशय जागरुकपणे खरेदी करावी. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. पासवर्ड कुणालाही शेअर करु नये. आपले आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हातळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष डॉ. विलास मोरे हे उपस्थित होते. तसेच प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य गोविंद देशमुख, सायबर सेलचे अधिकारी श्री. माकोडे, एसबीआय आर्थिक साक्षरता सल्लागार श्री. हट्टेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोरे व श्री. हट्टेकर यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, उर्मिला कोलगणे आदींसह तालुकास्तरीय ग्राहक तक्रार निवारण समितीचे सदस्य उपस्थित होते.