=मृतकांमधे आईसह, पाच महिण्याचा चिमुकला व तिन वर्षाच्या मुलीचा समावेश
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )-नवेगावबांध- बाराभाटी मार्गावरील भारती बार समोर एका चारचाकी वाहणाने दुचाकीला मागेहुन धडक दिल्याने दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज 26 जानेवारी रोजी दुपारी तिन ते साडे तिन वाजेच्या दरम्यान घडली.मृतकांमधे येरंडी / देवलगांव येथील 25 वर्षीय महिलेसह तिचा पाच महिण्याचा बाळ,व शेजारील तिन वर्षीय मुलीचा समावेश आहे.तर दुचाकी चालक गंभीर जखमी असुन त्यांना ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले असल्याची माहीती प्राप्त आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोर. तालुक्यातील येरंडी / देवलगांव येथील संदिप राजु पंधरे वय 29 वर्षे हा युवक आपल्या पल्सर मोटार सायकल क्रं.एम.एच.35 ए एम 2756 नी आपली पत्नी चितेश्वरी संदिप पंधरे वय 25 वर्षे,मुलगा संचित संदिप पंधरे वय 5 महिणे, व घराशेजारील पार्थवी रोहीत सिडाम वय तिन वर्षे,यांचेसह दुचाकी ने गावावरून नवेगावबांध येथे जात असता बाराभाटी – नवेगावबांध मार्गावरील भारती बार च्या जवळपास मागेहुन भरधाव येणा-या चारचाकी बोलोरो पिकअप क्रं.एम.एच.35- ए.जे.4482 ने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील चितेश्वरी संदिप पंधरे वय 25 वर्षे, 5 महिण्याचा चिमुकला संचित संदिप पंधरे,व घराशेजारील पार्थवी रोहीत सिडाम वय 3 वर्षे हे तिघेही जागीच ठार झाले.तर दुचाकी चालक संदिप राजु पंधरे वय 29 हा जबर जखमी झाला.घटनेची माहीती प्राप्त होताच नवेगावबांध पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले असुन मृतकांना व जखमीला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.जखमी संदिप पंधरे यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.दुचाकीला जबर धडक देणारा चारचाकी वाहन नवेगावबांध येथीलच असल्याची माहीती आहे. पाच महिन्याच्या चिमुकल्यासह आई,व शेजारील तिन वर्षाच्या मुलीचे अपघातात दुर्देवी मृत्यु झाल्याने पंधरे व सिडाम कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली.घटनेची माहीती मिळताच येरंडी गावातील शेकडो नागरीकांनी घटनास्थळासह ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे एकच गर्दी केली.यावेळी संपुर्ण वातावरण शोकाकुल झाले.नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक योगिता चाफले कसुन तपास करीत आहेत.तिन्ही मृतदेहांचे 27 जानेवारीला सकाळी शवविच्छेदन होणार आहे.