अर्जुनी /मोर- “शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान” च्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविले जाते. यापैकी सामाजीक विशेषतः शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार नरेंद्र बनकर या शिक्षकास जाहीर करण्यात आला.
स्थानिक अर्जुनी /मोर येथील जि. प. शाळेत मागील 5 वर्षांपासून उत्कृष्ट कार्य करत मोडकळीस चाललेली शाळा पुन्हा भरभराटीस आणली.
विशेषतः दरवर्षी म. रा. प्राथ. शिक्षक समितीच्या वतीने नवोदय सराव मालिकेचे आयोजन करून अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांना ६ फेब्रुवारीला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल , असे श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन डोंगरवार यांनी कळविले आहे. सदर सोहळा अर्जुनी मोर येथील प्रसन्ना सभागृहात पार पडणार आहे.