गोंदिया,दि.३०ःगंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सेजगाव ते नहरटोला मार्गावर काचेवानी येथील एका खासगी शाळेत शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलव्हॅन पलटल्याने १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज ३० जानेवारीला सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.घटनास्थळी गंगाझरी पोलीस दाखल झाली असून चालकाला ताब्यात घेतले आहे.जखमी विदयार्थ्यांना उपचाराकरीता रुग्णालयात हलविण्यात आले आहे.