लाखांदूर : साकोलीकडून वडसा येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना वाटेतच चारचाकी गाडीचे स्टेरिंग लॉक झाल्याने यात चारचाकी वाहनाचे अपघात झाल्याची घटना दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान मानेगाव येथे घडली आहे. या (Car accident) अपघातात कसल्याच प्रकारचे जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी वाहनाच्या चेंदामेदा झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार नागपूर येथील सिविल कॉन्ट्रॅक्टर प्रशांत रणदिवे, हे साकोली मार्गे वळसा येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना लाखांदूर तालुक्यातील बोरगाव पुढील मानेगाव फाटाजवळ चारचाकी वाहनाचे स्टेरिंग लॉक झाल्याने भरधाव वेगात असलेली चारचाकी रस्त्याच्या विरुद्ध असलेल्या एका झाडाला आढळून समोर खड्ड्यात कोसळली. (Car accident) दरम्यान गाडीतील एअर बॅग उघडल्याने जीवितहानी झाली नसली तरी चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झालेला आहे. सदर घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना कळताच दिघोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेच्या पंचनामा केलेला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.