अमरावती-लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे.दरवर्षी शेकडो लाचखोर अधिकारी,कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांत गजाआड होतात,मात्र लाच देण्याच्या बाबतीत हे प्रमाण शून्य आहे. गेल्या वर्षभरातील राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन लाच देणाऱ्या ठेकेदारांना रंगेहात पकडून गजाआड केल्याच्या घटनेची आणि कारवाईची एसीबीच्या दफ्तरी नोंद केली आहे.
मनिष नरेंद्र श्रीखंडे, वय २९ वर्षे, व्यवसाय -शासकिय कंत्राटदार,रा.घर नं.५४ केदारेश्वर मंदीर रोड, केदार चौक वरूड, जि. अमरावती व सुदेश भरत मेंघाणी, वय ३२ वर्षे, व्यवसाय शासकिय कंत्राटदार,रा.यशवंत बाबा कॉलनी, अमरावती रोड वरूड अशी ह्या दोन्ही “रिव्हर्स ट्रॅप” मधील लाच देणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
या दोन्ही लाच देणाऱ्या शासकीय ठेकेदारांना काल बुधवार दि.०५/०३/२०२५ रोजी सायंकाळी साडे पाच ते साडे सातच्या दरम्यान अरिहंतनगर परसोडी, ग्रामपंचायत हिंगणगाव ता.धामणगाव रेल्वे जि.अमरावती येथे रस्ता बांधकामा बद्दल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी सरपंचास २०,००० रुपयांची लाच देत असताना त्यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यातील तकारदार व सरपंच यांनी दि. ०३/०३/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती येथे दिलेल्या ठेकेदार यांच्या विरुद्ध दिलेल्या तकारीचे अनुषंगाने दि. ०५/०३/२०२५ रोजी पडताळणी कारवाई दरम्यान खाजगी इसम आरोपी नामे मनिष नरेंद्रराव श्रीखंडे, वय २९ वर्षे, व्यवसाय शासकिय कंत्राटदार, रा. घर नं. ५४ केदारेश्वर मंदीर रोड, केदार चौक वरूड, जि. अमरावती व सुदेश भरत मेधाणी, वय ३२ वर्षे, व्यवसाय शासकिय कंत्राटदार, रा. यशवंत बाबा कॉलनी, अमरावती रोड वरूड यांना मौजे ग्रामपंचायत हिंगणगाव येथील रस्ता तयार करण्याचे काम मिळाले आहे.सदरहू ठेकेदारांनी सदरचे काम १५ दिवसापुर्वी सुरू केले असुन रस्त्याचे काम शासनाच्या नियमाप्रमाणे न केल्याने तक्रारदार सरपंच यांनी बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिका-यांकडे तकारी केल्या होत्या. त्यामुळे तक्रारदार यांनी यातील आरोपीने निकृष्ट काम केल्यामुळे करण्यात आलेल्या तक्रारी मागे घ्याव्याते आणि कामकाज पुर्ण झाल्यावर ग्रामपंचायत कडून देण्यात येणा-या प्रमाणपत्रामध्ये अडचण निर्माण करू नये याकरिता आरोपी क्र.१ श्रीखंडे यांनी तक्रारदार सरपंच यांना लाच रक्कम म्हणुन २०,००० रूपये लाच देण्याचे मान्य करून २०,००० रुपये लाच रक्कम दिली. यातील आरोपी क्रमांक २ मेंघाणी यांनी लाच रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.
बुधवार दि.०५/०३/२०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान दोन्ही आरोपी नामे मनिष नरेंद्र श्रीखंडे,व सुदेश भरत मेघाणी,यांनी पंचासमक्ष लोकसेवक सरपंच यांना लाच रक्कम दिल्याने आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेविरूध्द दत्तापुर पोलीस ठाणे,धामणगाव जिल्हा अमरावती ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मंगेश मोहोड, पोलीस उपअधिक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई पथकातील पो.नि.संतोष तागड, पो.नि.केतन माजरे, पो.हवा. प्रमोद रायपुरे,पोहवा.युवराज राठोड,पो हवा.राजेश नेटकर,पोलीस अंमलदार शैलेश कडू,पो.अमलदार वैभव जायले, चालक पोउपनि.सतिश किटुकले, चालक पोहवा गोवर्धन नाईक यांनी यशस्वीरीत्या पार पाडली..