पोलिसांकडून ७२ पोती ३२ लाखांचा पान मसाला जप्त

0
83

गोंदिया : शेजारच्या छत्तीसगड राज्यातून ट्रकद्वारे येत असलेला पानमसाला देवरी पोलिस व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून रविवारी (दि. ९) पहाटे ४:३० वाजता मोठ्या शिताफीने पकडला. ही कारवाई भरेंगाव फाटा समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर करण्यात आली. ट्रकमधून ७२ पोती पानमसाला जप्त करण्यात आला आहे. आरोपी जाकीर मोहम्मद शेख (३३), राजाराम कचरू विश्वकर्मा (२१, रा. छुरीया, जि. देवांस, मध्य प्रदेश) व सैयदअली अहमद (रा. बलदेत बाघ वॉर्ड क्रमांक-१४, राजनांदगाव) हे तिघे ट्रक (सीजी ०८ एएस ९०२३) मध्ये ७२ पोती तंबाखूजन्य पानमसाला टाकून वाहतूक करून जिल्ह्यात शिरले असता देवरी पोलिस व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून रविवारी (दि. ९) पहाटे ४:३० वाजता दरम्यान भरेंगात फाट्यावर ट्रक पकडला. या कारवाईत पानमसाल्याचे (पान पराग प्रीमियम) १२० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी किंमत २०० रुपये, असे एकूण ६१२० पॅकेट्स २० पोत्यामध्ये (वजन ७३४.४ किलो ग्रॅम एकूण किंमत १२ लाख २४ हजार), पानमसाला (पान पराग प्रीमियम) प्रत्येकी १० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी किंमत १२० रुपये, असे एकूण १० हजार पॅकेट्स ३३ पोत्यांमध्ये (वजन ९०० किलो ग्रॅम एकूण किंमत एक लाख २० हजार), पानमसाला (पान पराग प्रीमियम) प्रत्येकी १२६ ग्रॅम वजनाचे प्रत्येकी किंमत २८० रुपये, असे एकूण दोन हजार २८० पॅकेट्स १९ पोत्यांमध्ये (वजन २८७.२८ किलो ग्रॅम एकूण किंमत सहा लाख ३८ हजार ४०० रुपये), सुगंधित तंबाखूचे (ऑल्ट जम्बो) १२ ग्रॅम वजनाचे प्रत्येकी किंमत ६० रुपये असे एकूण दोन हजार ८५० पॅकेट्स (१९ पोत्यांमध्ये एकूण वजन ३४.२ किलो ग्रॅम किंमत ७९ हजार), असा एकूण एक हजार ९५५.६६ किलो ग्रॅम पानमसाला एकूण किंमत ३२ लाख ३३ हजार ४०० रुपयांचा माल व प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी वापरलेला ट्रक (सीजी ०८ एएस १०२३) किंमत १४ लाख, असा एकूण ४६ लाख ३३ हजार ४०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई देवरी पोलिस व अन्न सुरक्षा अधिकारी महेश चहांदे (४४) यांनी केली आहे.

या प्रकरणात आरोपी जाकीर शेख, राजाराम विश्वकर्मा व सैयदअली अहमद यांच्यावर देवरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३, २७४, २७५ व १२३ सहकलम २६ (२), (आय) २६ (२), (आय व्ही), २७ (३), (३) ३ (१), (ड्रोड ड्रोड), (व्ही) ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.