धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची निर्घृण हत्या

0
439

अवघ्या 3 तासातच आरोपीतास जेरबंद करून खून प्रकरणाचा केला उलगडा

आमगाव: तहसील अंतर्गत येणाऱ्या पदमपूर सावंगी गावातील शेताच्या परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.माहितीनुसार, १३ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता  सावंगी आणि पदमपूर गावांदरम्यान पदमपूर येथील रहिवासी केशोराव यादवराव बागडे यांच्या शेताच्या परिसरात एका ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला, ज्याची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृताची ओळख पटवली. मृताचे नाव नरेश लालचंद चौधरी, वय ३५, रा. सावंगी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती १२ मार्च रोजी संध्याकाळी काही कामासाठी आमगावला जाण्यासाठी घराबाहेर पडला होता, परंतु रात्री घरी परतला नाही तेव्हा पोलिसांनी नरेशचे कुटुंब आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही आणि १३ मार्च रोजी सकाळी पदमपूर रोडवरील केशवराव बागडे यांच्या शेताच्या आवारात त्याचा मृतदेह आढळला.पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली तेव्हा हत्येत वापरलेले शस्त्र, दारू आणि पाण्याच्या बाटल्या आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक,. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव प्रमोद मडामे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांना तसेच पोलीस ठाणे आमगाव चे पोलीस निरीक्षक. तिरुपती राणे, यांना निर्देश सूचना देवुन सदर खुनाचा गंभीर गुन्हा करणाऱ्या अज्ञात आरोपीचा तत्काळ शोध घेवून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस जेरबंद कऱण्याचे निर्देश दिलेले होते.

या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, तसेच पोलीस ठाणे आमगाव येथील वेग वेगळी पोलीस पथके आरोपीचे शोधार्थ नेमण्यात आलेली होती… नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाने अतिशय संयमाने, बुध्दीकौशल्य, अथक परिश्रमाने खुनाच्या गुन्ह्याचे अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळा वरून प्राप्त भौतिक व परिस्थितीजण्य पुरावे, गावातील व गाव परिसरातील लोकांना विचारपूस, संशयितांची पडताळणी, तांत्रीक विश्लेषण, आणि प्राप्त माहिती वरून अत्यंत कुशलतेने आरोपी ईसंम नामेश्रवण हरीचंद सोनवानेवय 25 वर्षेरासावंगीतासालेकसा जि. गोंदिया यास खुनाच्या गुन्ह्यात दुपारी सावंगी येथून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले. आरोपी यास खुनाच्या गंभीर गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस चौकशी केली असता आरोपीने मृतक चा कोयत्याने खून केल्याचे कबूल केले असुन मृतक याचा खुन करण्याचे मुख्य उद्देश अद्याप कारण स्पष्ट होऊ शकले नाही.सदर संबंधात चौकशी सखोल विचारपूस तपास सुरू आहे.आरोपी यास आमगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून खुनाचे कारण गुन्ह्याचे पुढील तपासात निष्पन्न होईल.गुन्ह्यात आरोपी यास अटक पुढील तपास प्रक्रिया आमगाव पोलीस करीत आहेत….गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात पो. नि. तिरुपती राणे पो. स्टे. आमगाव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी सपोनि धीरज राजूरकर, मपोउपनि वनिता सायकर, पोउपनि. शरद सैदाणे, पोलीस अंमलदार पोहवा राजू मिश्रा, नेवालाल भेलावे, विठ्ठल ठाकरे, महेश मेहर, तुलसीदास लूटे, सुजित हलमारे, इंद्रजीत बिसेन, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, हंसराज भांडारकर, संतोष केदार, चापोशी कुंभलवार, राम खंडारे, मुरली पांडे, तसेच पोलीस ठाणे आमगाव- येथील पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, आणि पोलीस ठाणे आमगाव येथील पोलीस पथक, तसेच तांत्रिक सेलचे- पोलीस निरीक्षक. पुरुषोत्तम अहेरकर, अंमलदार रोशन येरणे, यांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी आरोपीस जेरबंद करण्याकरिता अथक परिश्रम घेवून खूनाच्या गंभीर गुन्ह्याचा तत्परतेने उलगडा केलेला आहे.