32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू

भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू

0
139

blank

साकोली : तालुक्यातील विर्शी फाट्याजवळ महामार्गावर प्रवासी घेऊन साकोलीच्या दिशेने येणारी भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली. त्यात ट्रॅक्टरचालकाचा जागीच मृत्यू झाला.सदर अपघात दि. ४ जून रोजी सकाळी १०.३० वाजतादरम्यान घडला. लेखचंद गोपीचंद कापगते (५०) रा.विर्शी, असे मृत ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.

साकोली तालुक्यातील विर्शी येथील लेखचंद कापगते हा ट्रॅक्टर (Speeding Bus Accident)) घेऊन साकोलीकडे जात असतांना विर्शी फाट्याजवळ प्रवासी घेऊन साकोलीकडे भरधाव जाणारी एसटी बस क्र.एमएच ४० एल ८८७२ चा चालक विकास लाडे रा.मुरारटोली गोंदिया याने आपल्या ताब्यातील बस निष्काळजीपणे चालवून ट्रॅक्टरट्रॉलीला मागेहून धडक दिली. यात ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला. सदर बस गोंदिया येथून नागपूरला जात असल्याचे सांगितले जाते.

अपघाताची माहिती साकोली पोलिसांना मिळताच पोहवा पूनम जांभूळकर यांनी आपल्या पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठून ट्रॅक्टरचालकाला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. (Speeding Bus Accident) घटनेची नोंद साकोली पोलिसात केली असून तपास पोहवा पूनम लांजेवार, दिनेश तिजारे करीत आहेत.

blank