34.7 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home गुन्हेवार्ता वडेगाव जंगल शिवारात गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

वडेगाव जंगल शिवारात गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

0
94

blank

 देवरी- तालुक्यातील मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बासनीटोला येथील एका इसमाने वडेगाव जंगल शिवारातील मोहाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज, बुधवार, १३ ऑगस्टला उघडकीस आली. मुकेश गोपीचंद नाईक (वय ५०) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मुल्ला ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम घासनीटोला येथील रहिवासी मुकेश नाईक हा व्यक्ती कुणालाही काही न सांगता काल (दि.१२) सायंकाळपासून घरून बेपत्ता होता. जंगलात शेळ्या चारायला गेलेल्या व्यक्तीला एक इसम मोहाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती नजीकच्या गावात वाऱ्यासारखी पसरली असता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मृतक व्यक्ती हा घासलीटोला या गावचा असल्याची ओळख पटली. सदर माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा तपास करून शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले.